लहान भावाने मानले मोठ्या भावाचे आभार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात लहान आणि मोठ्या भावाचे नाते असल्याचे सर्वश्रुत आहे. यामुळे मोठे भाऊ मोदी यांनी लहान भावाला मुख्यमंत्री पदासाठी दिलेल्या शुभेच्छाबद्दल उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.29) ट्टिवटरवरून मोठ्या भावाचे आभार मानले आहेत.

पुणे - राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात लहान आणि मोठ्या भावाचे नाते असल्याचे सर्वश्रुत आहे. यामुळे मोठे भाऊ मोदी यांनी लहान भावाला मुख्यमंत्री पदासाठी दिलेल्या शुभेच्छाबद्दल उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.29) ट्टिवटरवरून मोठ्या भावाचे आभार मानले आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री या नात्याने मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने काम केले जाईल,अशी ग्वाहीही ठाकरे यांनी मोदी यांना दिली आहे.

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.28) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर कालच पंतप्रधान मोदी यांनी ठाकरे यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले होते. त्यांच्या अभिनंदनाबद्दल लहान भाऊ ठाकरे यांनी आज मोदी यांचे "थॅंक यू ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी, अशा शब्दांत आभार मानले आहेत.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi and Maharashtra CM Uddhav Thackeray