
नवाब मलिकांचा कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला
मुंबई : दाऊद मनी लाँड्रींगप्रकरणी (Dawood Money Laundering Case) नवाब मलिक (Nawab Malik) सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपणार होती. पण, आज विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना पुन्हा ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा: 'आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही', SC चा मलिकांना दणका
दाऊदचा माणूस आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप नवाब मलिकांवर आहे. मलिकांनी गोवावाला कंपाऊंडमधील जमीन दाऊदची बहीण हसीना पारकरच्या हस्तकाकडून विकत घेतली होती, असेही आरोप मलिकांवर आहेत. ईडीने याच आरोपांची तपासणी करण्यासाठी मलिकांना फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. तब्बल ८ तासांची चौकशी केल्यानंतर मलिकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालायने मलिकांना ईडी कोठडी दिली. सध्या मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत. आज २२ एप्रिलला त्यांची न्यायालयीन कोठडी संपली होती. त्यांना आज विशेष पीएमएलए कोर्टात दाखल करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत ९ मेपर्यंत वाढ केली आहे.
ईडीने मलिकांविरोधात 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या प्रकरणांसाठी विशेष न्यायालय कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आरोपपत्राची दखल घेईल, असे वकिलांनी सांगितले होते. आज याच आरोपपत्राची पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नवाब मलिक यांचे कुटुंबीय तपासात सहकार्य करत नसल्याचे ईडीने म्हटले असून, ईडीने विशेष न्यायालयाला सांगितले की, नवाब मलिकांची मुले अमीर मलिक आणि फराज मलिक अनेक समन्स बजावल्यानंतरही चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत, असे आरोप ईडीने केले आहेत.
Web Title: Pmla Court Extends Nawab Malik Judicial Custody Till 9th May In Dawood Money Laundering Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..