Video: पप्पा नका जाऊ; बाहेर कोरोना...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोना विषाणूमुळे देशामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिस रस्त्यावर आहोरात्र उभे आहेत. आपले पप्पा ड्युटीवर जात असताना एका चिमुकल्याने फोडलेला हंबरडा पाहून डोळ्यात पाणी येते.

मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिस रस्त्यावर आहोरात्र उभे आहेत. आपले पप्पा ड्युटीवर जात असताना एका चिमुकल्याने फोडलेला हंबरडा पाहून डोळ्यात पाणी येते.

Video:नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको...

केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. बेजबाबदार नागरिक सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांचे काम वाढले आहे. मात्र, अशा परिस्थितीत त्यांना सुट्टी मिळणे अवघड आहे. अहोरात्र ते सेवा बजावताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ड्युटीवर निघालेल्या पोलिस अधिकाऱ्याकडून बघून त्याच्या मुलाने हंबरडा फोडला आहे. परिसरातील सर्वजण घरात आहेत. मग, माझ्याच बाबांना का बाहेर जावे लागत आहे, असाच प्रश्न जणू हा चिमुकला आपल्या अश्रूंमधून विचारत असावा.

'लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल?'

'बाळा...मला साहेबांचा फोन आला आहे. मी 2 मिनिटांत जाऊन येतो,' असं म्हणत हा पोलिस अधिकारी आपल्या चिमुकल्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, तरीही तो चिमुकला राहात नाही. 'पोलीस अधिकाऱ्यांचा छोटा मुलगा पप्पा बाहेर नका जाऊ बाहेर कोरोना आहे.. SALUTE POLICE', अशा शीर्षकासह हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमााणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स पोलिसांच्या कार्याला सलाम करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police and his son viral video viral on social media