कुंभमेळ्याच्या धर्तीवर पंढरपुरात बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी १३ जुलैला आषाढी वारीनिमित्त विविध राज्यांतून सुमारे आठ ते दहा लाख वारकरी पंढरपुरात दाखल होतात. या पार्श्‍वभूमीवर गर्दीचे नियंत्रण व गुन्हेगारीला आळा बसावा या उद्देशाने कुंभमेळ्यातील पोलिसांना ज्या संस्थेने प्रशिक्षण दिले, त्या नाशिकच्या संस्थेकडून चारशे पोलिसांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर - पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी १३ जुलैला आषाढी वारीनिमित्त विविध राज्यांतून सुमारे आठ ते दहा लाख वारकरी पंढरपुरात दाखल होतात. या पार्श्‍वभूमीवर गर्दीचे नियंत्रण व गुन्हेगारीला आळा बसावा या उद्देशाने कुंभमेळ्यातील पोलिसांना ज्या संस्थेने प्रशिक्षण दिले, त्या नाशिकच्या संस्थेकडून चारशे पोलिसांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, की वारकऱ्यांच्या रक्षणार्थ पोलिस यंत्रणा सज्ज असून, त्यासाठी साडेपाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांवर वचक बसावा आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे कौतुक व्हावे, या उद्देशाने पोलिसांना क्‍यूआर कोड देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police bandobast in Pandharpur