पोलिसांनी नक्षलवाद्यांचा कट उधळला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

यावर्षी 1 मे महाराष्ट्र दिनी गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात 15 जवान शहीद झाले होते.

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा कट आज (शनिवार) पोलिसांनी उधळल्याची माहिती मिळाली आहे. मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता, तो डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. 

या वेळी नक्षल्यांकडून बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच 25 डिटोनेटर, 3 मल्टिमीटर, वायर्स, 3 रिमोट आणि पेन्सिल सेल जप्त करण्यात आले आहेत. 

यावर्षी 1 मे महाराष्ट्र दिनी गडचिरोली जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात 15 जवान शहीद झाले होते. त्या अगोदर गेल्यावर्षी 25 एप्रिलला जवानांच्या कारवाईत 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police broke the conspiracy of Naxalites