वाळूजच्या उद्योजकांना सहकार्य करू पोलिस आयुक्तांची ग्वाही 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : वाळूज परिसरातील कंपन्यांमध्ये जमावाने तोडफोड करून मोठे नुकसान केले. यासंदर्भात उद्योजकांच्या शिष्टमंडळाने शनिवारी (ता. 11) पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली. या वेळी पोलिस आयुक्त म्हणाले, "कंपन्यांची तोडफोड करणाऱ्यांची गय करणार नाही. उद्योजकांनी कंपनीबाहेरील फाटकाच्या रचनेला महत्त्व देण्यापेक्षा मजबुती व सुरक्षेवर लक्ष केंद्रित करावे. यापुढे औद्योगिक वसाहतीत बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशांवर निर्बंध यावेत, यासाठी उद्योजकांना पोलिस सहकार्य करतील.'' 

मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंध नसलेल्यांनी हे कृत्य केल्याचेही उद्योजकांनी या भेटीत स्पष्ट केले. शिवाय नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, त्यासाठी चौकशीत पोलिसांना पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही उद्योजकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने मानसिंग पवार यांनी पोलिस आयुक्तांना दिली. या वेळी सुनील कीर्दक, जगन्नाथ काळे, अशोक बेडसे पाटील, बालाजी शिंदे, भारत मोतिंगे, अमित राजळे, राहुल घोगरे आदी उद्योजक उपस्थित होते. 

आयुक्तांचा सल्ला... 
-कंपनीच्या सुरक्षेवर भर द्या. 
-औद्योगिक वसाहतीत प्रवेशद्वारावरच नियंत्रण गरजेचे. 
-कंपनीत गेटकीपरपेक्षा तगडे सुरक्षारक्षक नेमा. 
-केवळ सुरक्षारक्षक एजन्सीच्या भरवशावर न राहता लायक व्यक्ती सुरक्षेसाठी निवडा. 
-प्रॉपर्टी संरक्षणाचा प्रत्येकाला हक्क आहे. त्याचा वापर करा. 
-तपास नव्या पोलिस उपायुक्तांकडे. 
-औद्योगिक वसाहतींच्या नव्याने सुरक्षा उपाययोजना करा. 
-पोलिसांचे मनुष्यबळ सुरक्षेला देऊ. 
 
Web Title: Police commissioner's testimony to cooperate with the Waluj industrialists