प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध भाजपची पोलिसांत तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

पंढरपूर - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी हेतुपुरस्सर मोदी सरकारची बदनामी केल्याच्या कारणावरून येथील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आंबेडकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून आंबेडकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भारिपच्या वतीने चार जुलै रोजी सोलापुरात हुतात्मा मंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत आंबेडकर यांनी केलेल्या भाषणात मोदी सरकार विरोधातील आरोप हे समाजहिताचे नव्हते.

पंढरपूर - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी हेतुपुरस्सर मोदी सरकारची बदनामी केल्याच्या कारणावरून येथील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आंबेडकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून आंबेडकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भारिपच्या वतीने चार जुलै रोजी सोलापुरात हुतात्मा मंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत आंबेडकर यांनी केलेल्या भाषणात मोदी सरकार विरोधातील आरोप हे समाजहिताचे नव्हते. त्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या आरोपांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारची बदनामी झाली आहे, असे वाईकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

Web Title: police complaint against BJP's Prakash Ambedkar