दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी 

Police custody of both the accused
Police custody of both the accused

मुंबई : नालासोपारा येथून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेल्या वासुदेव सूर्यवंशी व लीलाधर ऊर्फ विजय ऊर्फ भय्या लोधी यांना विशेष न्यायालयाने 17 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

संशयित व्यक्ती व ठिकाणांच्या रेकीमध्ये आरोपींनी मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आरोपींनी जळगाव व नाशिक येथे रेकी केली होती. हिंदू धर्माविरोधात बोलणारे व त्याचे विडंबन करणाऱ्या व्यक्ती या ग्रुपच्या निशाण्यावर होत्या. तीन गावठी बाँब, दोन मोबाईल, पेन ड्राईव्ह, वाहनांच्या दोन पाट्या लोधीकडून जप्त करण्यात आले आहेत. सूर्यवंशीच्या पाच डायऱ्या, तीन मोबाईल व पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना शनिवारी जळगाव येथील साकळी परिसरातून अटक करण्यात आली होती. 

बाँबशोध व नाशक विभागातील तज्ज्ञांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत सापडलेले बाँब गावठी आहेत. पुढील तपासणीसाठी ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपासात एटीएसने दोन कार, सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. प्राथमिक तपासात ही वाहने चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एटीएसने आतापर्यंत वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार यांना अटक केली आहे. 

नालासोपारातील वैभव राऊतच्या घर आणि दुकानात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) छापा घालून गावठी बाँब, जिलेटीनच्या कांड्या तसेच बाँब बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. स्फोटक पदार्थ म्हणून आरोपींनी गन पावडरचा वापर केल्याचे अहवालात निष्पन्न झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com