पोलिसानेच घातला लाखो रुपयांचा गंडा 

अनिश पाटील
सोमवार, 15 मे 2017

मुंबई - म्हाडाचे घर मिळवून देतो, अशी भूलथाप देऊन पोलिस हवालदारानेच माजी राज्यमंत्र्याच्या स्वीय सहायकाला 17 लाखांचा गंडा घातला. वरळी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नितीन श्रीरंग गायकवाड (वय 41) असे त्याचे नाव आहे. 2011 ते 2014 या कालावधीत ही फसवणूक झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

तक्रारदार विजय काळे हे माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे 2010 मध्ये स्वीय सहायक होते. त्याच वेळी हवालदार गायकवाड माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांचा अंगरक्षक होता. त्यामुळे गायकवाडचे मंत्रालयात सतत जाणे व्हायचे. त्यातूनच त्याचा काळे यांच्याशी परिचय झाला. काळे त्या वेळी त्यांच्या भावासाठी घर शोधत होते. म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देतो, अशी भूलथाप देत गायकवाडने काळे यांच्याकडून टप्प्याटप्प्याने सुमारे साडे सतरा लाख रुपये घेतले. मात्र, घर न मिळाल्याने काळे यांनी पैसे परत मागितल्यानंतर गायकवाडने टाळाटाळ केली. अखेर, काळे यांनी वरळी पोलिसांत तक्रार दिली होती. शनिवारी पोलिसांनी गायकवाडला अटक केली. याआधी गायकवाडच्या विरोधात माटुंग्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. 

Web Title: Police looted millions of rupees