बुलडाण्याच्या जवरेंना मानाची तलवार

नाशिक - महाराष्ट्र पोलिस अकादमीतील दीक्षान्त सोहळ्यात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी असणारी मानाची तलवार स्वीकारताना बुलडाण्याचे राजेश जवरे. (शेजारी) गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, रणजित पाटील
नाशिक - महाराष्ट्र पोलिस अकादमीतील दीक्षान्त सोहळ्यात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी असणारी मानाची तलवार स्वीकारताना बुलडाण्याचे राजेश जवरे. (शेजारी) गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, रणजित पाटील

नाशिक - येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या कवायत मैदानावर दिमाखदार सोहळ्यात पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षकांच्या ११५ व्या तुकडीच्या दीक्षान्त सोहळ्यात मानाची तलवार बुलडाण्याचे राजेश जवरे यांनी पटकावली. विविध गटांतील सर्वाधिक पारितोषिकांसह मानाची तलवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजेश जवरे यांना प्रदान करण्यात आली. 

त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या कवायत मैदानावर आज ११५ व्या पोलिस उपनिरीक्षक तुकडीचा दीक्षान्त सोहळा मोठ्या दिमाखदारपणे आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशिक्षणादरम्यान विविध स्वरूपांत बक्षिसांचे मानकरी ठरलेल्या प्रशिक्षणार्थींना चषक प्रदान करण्यात आला. 

व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, अकादमीच्या संचालक श्रीमती अश्वती दोरजे उपस्थित होते. 

अकादमीच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ८१७ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांनी शानदार संचलन केले. त्यानंतर विविध पदकांचे वितरण करण्यात आले. अश्‍वती दोरजे यांनी प्रशिक्षणार्थींना शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकादमीच्या आवारातील ओपन एअर थिएटर आणि कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या १६८ फ्लॅट असलेल्या सप्तशृंगी इमारतीचे उद्‌घाटन करण्यात आले. 

महाराष्ट्र पोलिस दलाचा सुवर्णमय इतिहास आहे. सर्वसामान्य, पीडित, अन्यायग्रस्तांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याची महत्त्वाची भूमिका पोलिसांची असते. ही भूमिका निभावून नेत असताना जातपात, धर्म-पंथांच्या भिंती नाहीशा करून देशसेवेची समर्पित भावना महत्त्वाची आहे, असे फडणवीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com