राज्यातील 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलिस पदकं जाहीर

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालेले अधिकारी : 

शिवाजी तुळशीराम बोडखे, (सहाय्यक पोलिस आयुक्त), दयानंद हरिश्चंद्र ढोमे (पोलिस निरीक्षक), बाळू प्रभाकर भवार (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक). 

नवी दिल्ली : राज्यातील 51 पोलिस अधिकारी-कर्मचारी पोलिसांना विशेष आणि उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहेत.

राज्यातील एकूण 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलिस पदकांनी सन्मान करण्यात येणार आहे. राज्यातील केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) दोन अधिकाऱ्यांनाही पोलिस पदकं जाहीर झाली आहेत. यामध्ये मुंबईतील राखीव पोलिस दलाचे निरीक्षक राधेशाम पांडे आणि नागपूरचे उपनिरीक्षक सुरेश कुमार थापा यांचा समावेश आहे. तसेच आठ पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांना शौर्य पदकं जाहीर झाली आहेत. तर तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात येणार आहे. याबाबतची यादी केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली आहे. यामध्ये देशभरातील 942 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालेले अधिकारी : 

शिवाजी तुळशीराम बोडखे, (सहाय्यक पोलिस आयुक्त), दयानंद हरिश्चंद्र ढोमे (पोलिस निरीक्षक), बाळू प्रभाकर भवार (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक). 

शौर्यपदक जाहीर झालेले अधिकारी-कर्मचारी :

शितलकुमार अनिककुमार डोईजड (पोलिस उपनिरीक्षक), हर्षद बबन काळे (पोलिस उपनिरीक्षक), प्रभाकर रंगाजी मडावी (पोलिस कॉन्स्टेबल), महेश दत्तू जाकेवार (पोलिस कॉन्स्टेबल), अजितकुमार भगवान पाटील (पोलिस उपनिरीक्षक), टिकाराम संपतराय काटेंगे (नायब पोलिस कॉन्स्टेबल), राजेंद्र श्रीराम तडमी (पोलिस कॉन्स्टेबल), सोमनाथ श्रीमंत पवार (पोलिस कॉन्स्टेबल).

Web Title: For Police officers and Policemen declared for 51 Medals in State