अन् पोलिसाने लग्नपत्रिकेवरच छापला आर. आर पाटलांचा फोटो

Police printed the R R patil Photo on the wedding invitation in beed district
Police printed the R R patil Photo on the wedding invitation in beed district

पुणे : मराठवाड्यातील एका पोलिसाने आपल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवरच महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचा फोटो छापला आहे. सध्या ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथील ही घटना आहे. नितीन बाबासाहेब जाधव या तरुणाच्या लग्नात त्यांच्या भावाने आर आर पाटील यांचा फोटो पत्रिकेवर छापला आहे.

२०१४ साली आर आर पाटील हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. त्यांच्या काळात त्यांनी जवळपास ११००० जणांची मेगा पोलिस भरती केली. आर आर पाटील यांच्या कार्यकाळात पोलिस भरतीत नोकरी मिळाल्याची आठवण ठेवत ती आठवण भावाच्या विवाह निमंत्रण पत्रिकेतून त्यांनी जागी केली आहे.

धक्कादायक! वाईड बॉल टाकला म्हणून गोलंदाजाची डोक्यात बॅट घालून मैदानावरच हत्या

यावेळी माहिती देताना कृष्णा बाबासाहेब जाधव म्हणाले, आबांचा फोटो टाकण्याची इच्छा ही माझ्याच लग्नात होती. परंतु काही घरगुती अडचणींमुळे २०१६ साली झालेल्या माझ्या लग्नात मी पत्रिका छापू शकलो नाही. त्यामुळे आबांचा फोटो टाकण्याची इच्छा राहून गेली. ती इच्छा भावाच्या लग्नात पूर्ण केली असल्याचे त्यांनी सांगितले. एवढी मोठी भरती झाली नसती तर मी कधीही पोलिसांत भरती झालो नसतो अशी भावनाही जाधव यांनी व्यक्त केली.
 
पाकिस्ताच्या 2800 जणांना भारतीय नागरिकत्व; केंद्र सरकारची माहिती

तत्पूर्वी, २०१४मध्ये झालेल्या पोलिस भरतीत कृष्णा बाबासाहेब जाधव हे भरती होऊन बीड वाहतूक शाखेत सेवेला रुजू झाले आहेत. तसेच लग्न असलेले त्यांचे बंधू नितीन बाबासाहेब जाधव हेही पोलिसांत सेवेला आहेत. ते बीड शहर पोलिस स्थानकात हवालदार पदावर सेवा बजावत आहेत. ते २०१६ साली भरती झाले आहेत. कृष्णा बाबासाहेब जाधव हे सहा वर्षापासून तर नितीन बाबासाहेब जाधव हे चार वर्षापासून आपली सेवा बजावत आहेत. दरम्यान, नितीन बाबासाहेब जाधव यांचे काल (ता.१८) शनिवारी लग्न पार पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com