पोलिस भरतीसाठी आधी लेखी परीक्षा

Police-Recruitment
Police-Recruitment

भवानीनगर - पोलिस भरतीकडे लक्ष ठेवून असलेल्या लाखो उमेदवारांना राज्य सरकारने धक्का दिला आहे. आता मैदानी परीक्षेऐवजी अगोदर लेखी परीक्षा असेल. याशिवाय मैदानी परीक्षेला शंभरऐवजी पन्नास गुण असणार आहेत. 

महाराष्ट्र पोलिस भरती-२०१९ चे नियम राज्य सरकारच्या गृह विभागाने शनिवारी जाहीर केले. त्यानुसार आतापर्यंत अगोदर १०० गुणांची होणारी मैदानी चाचणी आता फक्त ५० गुणांची होणार आहे. ही मैदानी चाचणी नेहमीप्रमाणे अगोदर होणार नसून अगोदर लेखी परीक्षा होणार आहे. 

लेखी परीक्षा नेहमीप्रमाणे १०० गुणांचीच असणार आहे. परीक्षेतील सर्व विषयही नेहमीप्रमाणेच राहणार आहेत. लेखी परीक्षेतील अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे विषय पूर्वीप्रमाणेच असणार आहेत. लेखी परीक्षेत खुल्या गटास किमान ३५ टक्के, तर राखीव गटासाठी ३३ टक्के गुण मिळविणे आवश्‍यक आहेत. त्यानंतरच मैदानी चाचणीसाठी ते पात्र ठरतील. एका जागेसाठी पंधराऐवजी आता फक्त पाच जण या प्रमाणातच उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले जाणार आहे. 

मैदानी चाचणीत पूर्वी पुरुष उमेदवारांसाठी पाच, तर महिलांसाठी चार प्रकार होते. आता पुरुषांसाठी लांबउडी, पुलअप्स वगळून केवळ तीन व महिलांसाठीही लांब उडी वगळून तीनच प्रकार ठेवण्यात आले आहेत.

अनेक जिल्ह्यांत अर्ज करणे अशक्‍य - रूपनवर
पोलिस भरती मार्गदर्शक उमेश रूपनवर याबाबत म्हणाले, ‘‘या निर्णयामुळे आता उमेदवारांना पूर्वीसारखे अनेक जिल्ह्यांत अर्ज भरता येणार नाहीत. कारण अगोदर लेखी परीक्षा असल्याने ती एकाच वेळी होण्याची शक्‍यता आहे. राज्यात दरवर्षी आठ लाखांवर उमेदवार पोलिस भरतीची परीक्षा देतात. नव्या निर्णयामुळे या संख्येवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. लेखी परीक्षा अगोदर घेतली याचे स्वागत आहे; परंतु पोलिस शिपाई हा फिरणारा कर्मचारी असल्याने मैदानी चाचणीकडे होणारे दुर्लक्ष अनाकलनीय आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com