ध्वनी प्रदूषण झाल्यास पोलिसांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

मुंबई : उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांनी असमाधानकारक कामगिरी केल्यामुळे उच्च न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांनाच यासंबंधीच्या नियमांची अंमलबजावणी आणि पाहणी करण्याचे आदेश बुधवारी दिले.

तसेच यापुढे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई करणार, असे म्हणत बोरिवली आणि उल्हासनगरच्या सहायक पोलिस आयुक्तांविरोधात खंडपीठाने नोटीसही बजावली.

दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आणि दसरा अशा उत्सवांमध्ये सर्रासपणे ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक तक्रारी राज्य सरकारच्या संकेतस्थळावर आणि संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील 61 तक्रारींपैकी केवळ 11 तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली.

उर्वरित तक्रारींबाबत काहीही कारवाई केलेली नाही. न्या. अभय ओक व न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या या बेजबाबदारपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ध्वनिवर्धकावर मोठ्या आवाजात गाणी वाजताना पाहूनही पोलिसांनी त्यावर तत्काळ कारवाई का केली नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली. सहायक पोलिस आयुक्तांकडे (एसीपी) यासंबंधीच्या कारवाईची जबाबदारी आहे. त्यामुळे तूर्तास दोघांना नोटीस बजावून कारवाई सुरू करणार, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

Web Title: Police will be responsible for sound pollution, orders High Court