पोलिस आयुक्‍तालयात महिलांसाठी 'भरोसा'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

माहेरची लुडबूड अथवा सासरच्या मंडळींकडून लहान-लहान गोष्टींवरून होणारा छळ आणि त्यातून पती-पत्नीतील विकोपला गेलेला वाद मिटविण्यासाठी पोलिस आयुक्‍तालयात महिला सुरक्षा कक्ष सुरू करण्यात आला आहे.

सोलापूर : कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या आणि पतीसह सासरच्या व्यक्‍तींच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित महिलांचा तुटलेला संसार जोडण्यासाठी पोलिस आयुक्‍तालयातील महिला सुरक्षा कक्षाचे स्वरूप आता बदलले असून त्याला "भरोसा' असे नाव देण्यात आले आहे. त्यासाठी समुपदेशक, डॉक्‍टर, वकील, संरक्षण अधिकारी, सेवाभावी संस्थांसह 11 जणांची नव्याने नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

माहेरची लुडबूड अथवा सासरच्या मंडळींकडून लहान-लहान गोष्टींवरून होणारा छळ आणि त्यातून पती-पत्नीतील विकोपला गेलेला वाद मिटविण्यासाठी पोलिस आयुक्‍तालयात महिला सुरक्षा कक्ष सुरू करण्यात आला आहे. मात्र, सासरच्या मंडळींकडून छळ होण्याच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर तुटणारा संसार पुन्हा जोडावा या उद्देशाने महिला सुरक्षा कक्षाला "भरोसा' असे नाव देण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police will help Women with Bharosa in Solapur