LOksabha 2019: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सरसावले; बैठकांचे सत्र

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबईत काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्या उपस्थितीत प्रदेश नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक होत असून काॅग्रेस पश्चिम महाराष्ट्रातून जनसंवाद यात्रा सुरू करत आहे.
 

मुंबई: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीचे वारे आजपासून खऱ्या अर्थाने घोंघावू लागले आहे. आज दिल्लीत पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजपच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे. तर राष्ट्रवादी काॅग्रेसच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी देशभरातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. 

त्याचबरोबर, मुंबईत काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्या उपस्थितीत प्रदेश नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक होत असून काॅग्रेस पश्चिम महाराष्ट्रातून जनसंवाद यात्रा सुरू करत आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही 2019 च्या लोकसभा निवडणुकीची खलबतं सुरू केली आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील खासदार, आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून निवडणूकीच्या तयारीची चाचपणी केली आहे. तसेच दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार आणि नगरसेवकांना उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शन करत तयारीला लागण्याचे आदेश दिलेत.

Web Title: Political parties gear up for 2019 Lok Sabha election