'शेठजी-भटजी' आता गुळगुळीत

maharashtra government
maharashtra government

पूर्वीपासून विशेषत: भाजप हा शेठजी-भटजीचा असल्याची टीका केली जाते. आजचे जे नेते टीका करतात आणि जे शब्द आपल्या भाषणात वापरतात त्यापैकी बरेच शब्द वापरून गुळगुळीत झालेत. पुन्हा पुन्हा तेच तेच शब्द कानी पडत असल्याने या नेत्यांची भाषणे ऐकणे आणि वाचणे कंटाळवाणे आणि नकोस झाले.

आजच्या निवडणुकीचे तंत्र बदलले. प्रचारही हायटेक झाला. लक्ष वेधून घेणाऱ्या घोषणा. नेत्यांची अभ्यासपूर्ण, मिस्कील, आक्रमक, विनोद, विरोधकांना घायाळ करणारे शब्द वापरणारे नेते राज्याने पाहिले. ठाकरे फॅमिलीच्या मुखातून बाहेर पडणारे जहाल, शिवराळ आणि कधी न ऐकलेले शब्द बाहेर पडले की त्याची चर्चा होतेच. तसेच ग्रामीण ढंगात भाषण करतानाच म्हणीचा आणि उदाहरण देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. त्यांच्या पंक्तीत गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, आर. आर. पाटील, विलासराव देशमुख आदी नेतेही होते. म्हणूनच त्यांना मासबेस म्हणून महाराष्ट्र ओळखत होता. त्यापैकी काही नेते आज आपल्यात नाहीत. 

पूर्वीपासून विशेषत: भाजप हा शेठजी-भटजीचा असल्याची टीका केली जाते. आजचे जे नेते टीका करतात आणि जे शब्द आपल्या भाषणात वापरतात त्यापैकी बरेच शब्द वापरून गुळगुळीत झालेत. पुन्हा पुन्हा तेच तेच शब्द कानी पडत असल्याने या नेत्यांची भाषणे ऐकणे आणि वाचणे कंटाळवाणे आणि नकोस झाले. तरुणांच्या हृदयाला भिडेल अशा आकर्षक शब्दांचा खरे तर खेळ व्हायला हवा.आज "पीआर' कंपन्या पावसाळ्यात उगविणाऱ्या छत्र्याप्रमाणे पाहण्यास मिळतात. पण या नेत्यांची पत्रकबाजी आणि त्यांना प्रसिद्ध देण्याशिवाय ते काहीच करताना दिसत नाहीत. सोलापुरात भाषण करताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले,"" भाजप हा शेठजी आणि भटजींचा पक्ष आहे.'' त्यामध्ये नवीन असे काहीच नाही. खरेतर पूर्वीचा भाजप आणि आजचा भाजप खूप बदललेला दिसतो. आता या पक्षाला केवळ शेठजी आणि भटजींचा पक्ष म्हणता येणार नाही. तसे असते ते सत्तेवरच आले नसते. शेठजी आणि भटजींना मग निवडून दिले कोणी हा ही प्रश्‍न येतोच की ? कॉंग्रेस, "राष्ट्रवादी', शिवसेना काय किंवा भाजप काय ! सर्वच पक्षात विविध जातीजमातींचे लोक सर्वपदावर दिसतात. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर किंवा सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर तुटून पडताना असे शब्द उच्चारले पाहिजेत की त्याची चर्चा महाराष्ट्रात झाली पाहिजे. आर.आर. आबा नेहमीच वृत्तपत्राचा मथळा द्यायचे. पत्रकारांचे लक्ष वेधून घ्यायचे. आक्रमकतेबरोबरच मिश्‍किलपणाही त्यांच्याकडे होता. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नारायण राणे, पंकजा मुंडे आदी नेते असले तरी त्यांच्या भाषणाचा फड काही रंगताना दिसत नाही. अपवाद राज ठाकरे, धनंजय मुंडे आदी नेत्यांचा असू शकतो. हिंदी, मराठी चित्रपटातही शब्दांचा खेळ आपणास पाहण्यास मिळतो. चित्रपटातील शब्दांचाही वापर करता येईल. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुखांची जुगलबंदी ऐकण्यासारखी असायची. तशी जुगलबंदीही खूप दिवस कानावर पडली नाही. शरद पवार आणि बाळासाहेबांचाही सामना रंगत असे. उलट कुठे गाढव, माकड, कुत्रा असे शब्दप्रयोग वापरल्याने राजकारणाची पातळी खालावण्यास मदत होते. आजकाल हशा-टाळ्या पडतात पण श्रोत्यांना खिळवून ठेवणारा नेता एकही दिसत नाही. मुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षातील नेते तुलनेने तरुण. राजकारणाकडे तरुणाई आकर्षित होतानाही दिसते. खणखणीत आणि अष्टपैलू नेतृत्व घडविण्यासाठी सर्वच पक्ष पुढे आले पाहिजेत. रामभाऊ म्हाळगी असे उपक्रम राबवीत असते. त्याच धर्तीवर इतर पक्षांनीही विचार करायला हवा. नवी थिंक टॅंक आणि मास बेस नेत्यांच्या प्रतीक्षेत महाराष्ट्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com