राज्यात सत्ताधाऱ्यांना बारा आमदारांची 'बंपर लॉटरी'...

प्रशांत बारसिंग 
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

राज्यात सध्या सत्ता स्थापण्याचा तिढा कायम असला तरी काही दिवसांतच नवे सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणाऱ्या भाजपने अद्यापपर्यंत सत्तेचा प्रयत्न सोडलेला नाही. पडद्याच्या पाठीमागे भाजपने आमदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

मुंबई : राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या राजकीय पक्षांना राज्यपाल नामनियुक्‍त तब्बल 12 आमदारांची बंपर लॉटरी लागणार आहे. तसेच, बदललेल्या राजकीय समीकरणामुळे पुढील पाच वर्षांत होणाऱ्या विधान परिषदेतील विविध निवडणुकांमध्येही चांगला फायदा होणार आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात सध्या सत्ता स्थापण्याचा तिढा कायम असला तरी काही दिवसांतच नवे सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणाऱ्या भाजपने अद्यापपर्यंत सत्तेचा प्रयत्न सोडलेला नाही. पडद्याच्या पाठीमागे भाजपने आमदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची नवीन आघाडी आकारास येत आहे. या तीन पक्षांकडून लवकरच सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात येणार आहे. येत्या दोन- तीन दिवसांतील घडामोडीनंतर हे तीन पक्ष सत्ता स्थापण्याचा दावा करणार असल्याचे सूतोवाच करत आहेत. 

युती केली चूक झाली : रावसाहेब दानवे

दरम्यान, जो पक्ष राज्यात सत्ता स्थापन करेल त्याला विधान परिषदेतील संख्याबळ वाढविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. येत्या 24 एप्रिल 2020 रोजी राज्यपाल नामनियुक्‍त बारा जागा रिक्‍त होत आहेत. या जागा भरण्यासाठी सरकारकडून उमेदवारांची यादी राज्यपालांकडे सोपविण्याची पद्धत आहे. म्हणजेच सत्ताधारी पक्षाला हे आमदार आयतेच मिळत असतात. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येकाच्या वाट्याला यातील तीन आमदार मिळू शकतात. तसेच, पुढील पाच वर्षांत होणाऱ्या विविध निवडणुकांतही सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात अधिकच्या जागा पडणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. 

बाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीस म्हणतात, स्वाभिमान जपा

पाच वर्षांत रिक्‍त जागांसाठी होणाऱ्या निवडणुका 
- जुलै ते ऑगस्ट 2020 : 6 जागा (औरंगाबाद तथा जालना स्थानिक स्वराज्य संस्था, औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि पुणे शिक्षक) 

- 24 एप्रिल 2020 : 9 जागा 
(विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या जागा - यात कॉंग्रेसच्या 3, राष्ट्रवादी कॉंग्रेस 3, भाजप 2, तर शिवसेनेच्या एका जागेचा समावेश आहे) 

- 24 एप्रिल 2020 : 12 जागा 
(राज्यपाल नामनियुक्‍त - यात कॉंग्रेसच्या 5, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 6, तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जागेंद्र कवाडे यांचा समावेश आहे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political party in power increase MLC in assembly at Maharashtra