Sharad Pawar: शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात वर्षानुवर्षाची कटुता का ? आत्मचरित्रात सांगितलंय कारण

Sharad Pawar Vs Prithviraj Chavan News: महाराष्ट्रात शरद पवार विरोधी गट सुरूवातीपासूनच कार्यरत आहे.
Sharad Pawar Vs Prithviraj Chavan News
Sharad Pawar Vs Prithviraj Chavan News

महाराष्ट्रात शरद पवार विरोधी गट सुरूवातीपासूनच कार्यरत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा गट म्हणजे भाजप असेल तर असे नाही. शरद पवार यांना सर्वात मोठा विरोध हा काँग्रेसमधूनच झाला होता.

काँग्रसमध्ये महाराष्ट्रात दोन मोठे नेते आहेत एक पृथ्वीराज चव्हाण आणि दुसरे सुशिलकुमार शिंदे! मात्र या दोघांचे कधीच जमले नाही. पृथ्वीराज चव्हाण आधीपासून शरद पवार यांना विरोध करत आले आहेत. शरद पवार यांनी त्यांचे आत्मचरीत्र लोक माझे सांगती यामध्ये या वादावर स्पष्ट लिहले आहे.

२०१४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारला मोठा धक्का बसला होता. शिवसेना आणि भाजप युतीचे ४२ खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत तगडे आव्हन उभे होते. हे आव्हान पेलायला आम्ही सज्ज होतो.

मात्र आघाडीतला घटक पक्ष काँग्रेसचं खरं आव्हान राष्ट्रवादीला होत. २०१० नंतर महाराष्ट्रात काँग्रेसने विशेषत: पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेची चिंता होती, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

काँग्रेस-राष्ट्रवादी सलग १५ वर्ष होती. याचे श्रेय शरद पवार यांनी विलासराव देशमुख , सुशिलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांना दिले आहे. या नेत्यांमुळे सरकारचा कारभार आणि आघाडीतील समन्वय चांगला चालला होता.

योग्य समज आणि परिपक्वता यांच्याकडे होती. स्वपक्षाचं हित पाहत असताना घटक पक्षाला बरोबर घेऊन चालण्याची संतुलित वृत्ती त्यांची होती. विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी असताना आघाडी सरकारच्या काळातील सर्वात सुलभ आणि परस्परसामंजास्याचा कालघंड होता.

सुशिलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी देखील मुख्यमंत्री झाल्यावर समजुतदार भूमिका घेतली. त्यामुळे फारसा खडखडाट आणि न होता, तिव्र मतभेद न होता, सरकार चालले, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेसने सुत्र दिली. त्यामुळे शरद पवार यांची चिंता वाढली. चव्हाण म्हणाले, परंतू ते सर्वांना सोबत घेऊन काम करतील का?, याबाबत शरद पवार यांना शंका होती.

Sharad Pawar Vs Prithviraj Chavan News
Maharashtra Politics: जागावाटपावरून काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद! राज्यातील ३ नेते हायकमांडला भेटणार

वादाची पार्श्वभूमी काय?

पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव आणि आई प्रेमलता यांच काँग्रेसमधील स्थान मोठं होतं. परंतू त्यांचा सांधा यशवंतराव चव्हाण यांच्या मानणाऱ्यांशी त्यांचा फारसा घरोबा नव्हता.  यशवंतराव चव्हाण यांना न मानणाऱ्यांशी त्यांचा घरोबा होता.

दिल्लीतल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कलानं चालणारे, अशी पृथ्वीराज चव्हणा यांच्या कुटुंबीयांची ओळख होती. माझ्याशी त्यांचे फार सुर जुळले नाहीत. त्यांची काँग्रेस श्रेष्ठींसमवेत असलेली जवळीक राज्याच्या राजकारणात अडचणी निर्माण करेल अशी आम्हीला भिती असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर राष्ट्रवादी हा आपला घटक पक्ष आहे. या भूमिकेत अंतर पडायला सुरूवात झाली. अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात गोवण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस हेच पहिले लक्ष पृथ्वीराज चव्हाण यांचे होते. त्यांची वागणूक उभय पक्षात ताण निर्माण करणारी ठरली. आघाडीत दोन गड पडले होते. राष्ट्रवादीचे सर्व मंत्री नाराज होते. (Marathi Tajya Batmya)

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाले होते. मात्र त्यानंतर काही बदल होतील अशी अपेक्षा होती. महाराष्ट्रात भाजपचं तगड आव्हान असताना विधानसभा निवडणूक आघाडी करुन  लढवावी अशी आमची मांडणी होती. मात्र काँग्रेसने विसंगत भूमिका घेतली.

तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस वेळ पडली तर स्वबळावर लढेल, अशी आक्रमक भाषा वापरली होती. त्यांनी उमेदवार जाहीर करण्याची तारीख देखील जाहीर केली. राष्ट्रवादीचं भाजपसबत छुप सामंजस्य असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.

आजही कटुता कायम -

राज्यात महाविकास आघाडी विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. शरद पवार महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आहेत. आघाडीत आजही शरद पवार यांना शब्द मोठा मानला जातो.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष आहेत. काँग्रेसला महाविकास आघाडीत स्थान देताना शरद पवार यांची देखील मोठी दमछाक झाली होती. शरद पवार यांनी थेट सोनिया गांधी यांची भेट घेत प्रश्न सोडवला होता.

आघाडीत आजही शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात कटुता कायम आहे. आजही पृथ्वीराज चव्हाण शरद पवार विरोधी भूमिका घेतात. पृथ्वीराज चव्हाण यांनी निपाणीत केलेले वक्तव्य याची साक्ष देतो.

राष्ट्रवादीची भाजपबरोबर बोलणी सुरू आहे आणि पक्षाच्या काही नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला होता. राष्ट्रवादी महाविकास आघाडीत कधीपर्यंत राहील, हे सांगता येत नाही, असे चव्हाण म्हणाले होते.

शरद पवार यांनी देखील चव्हाण यांच्यावर पलटवार केला होता. काही जणांची मते पक्की असतात. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून काही जण विरोधी मत व्यक्त करीत आहेत व त्यात चव्हाण यांचा समावेश आहे.

आम्ही या मतांची गांभीर्याने नोंद घेत नाही आणि जनताही ती गांभीर्याने घेत नसावी. त्यांची राष्ट्रवादी कॅटॅगिरी काय आहे, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला होता.

Sharad Pawar Vs Prithviraj Chavan News
Ajit Pawar : आपणही अजमेरला चादर चढवायला जातो ; त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन अजित पवार संतापले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com