नाणारवरून राजकारण पेटले

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मुंबई - स्थानिकांचा विरोध डावलून नाणारचा रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. ‘‘कोकणची राखरांगोळी होऊ देणार नाही, हा शब्द मुख्यमंत्र्यांनी फिरवला असून, ते फितूर झाले आहेत. दिल्लीत त्यांचा शब्द चालत नाही, हे सिद्ध झाले आहे,’’ अशी टीकाही ठाकरे यांनी केली आहे. तर, दुसरीकडे ‘करार झाला तरी ग्रामस्थांच्या ठरावाशिवाय प्रकल्प प्रत्यक्षात येईलच कसा?’ असा प्रतिप्रश्‍न नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उपस्थित केला आहे.

दिल्लीतील निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती का, अशीही विचारणा होते आहे. महाराष्ट्राशी चर्चा न करताच सौदी अरेबियातील कंपनीशी करार झाला का, असा प्रश्‍नही आता विचारला जातो आहे. त्यातच फडणवीस यांच्या भेटीनंतर नारायण राणे यांनी, ‘‘करार झाला तरी ग्रामस्थांच्या ठरावाशिवाय हा प्रकल्प प्रत्यक्षात येईलच कसा?’ अशी विचारणा करीत अद्याप काहीही अंतिम झाले नसल्याचे सूचित केले. 

मात्र, या करारामुळे शिवसेना अस्वस्थ झाली असून, उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कठोर शब्दांत पत्र लिहिले आहे. ‘‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही अखेर पिचक्‍या कण्याचेच निघाले. कोकणचे वैभव मारू नका, तिथला आंबा, बांबू, वने नष्ट होतील असे काही करू नका, हे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते. माझ्या जनतेवर अन्याय होत असेल, तर मी गप्प बसणार नाही, असे त्यांनी दिल्लीस ठासून सांगायला हवे होते. मुख्यमंत्री फितूर झाले असले तरी हा प्रकल्प होऊ देणार नाही,’’ असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: Politics from NANAR refinery project