प्रमुख शहरांमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 एप्रिल 2018

मुंबई - प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईत 50 ठिकाणी; तर राज्यातील पाच महापालिका क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. ट्रॅफिक सिग्नल, बस आणि रेल्वे स्थानके, टोल नाके, वाहनतळ, पेट्रोल पंप, बांधकाम सुरू असलेली ठिकाणे, बाजारपेठा आदी ठिकाणी हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते; तर धूर आणि धुळीचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणे गरजेचे आहे.

मुंबई - प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईत 50 ठिकाणी; तर राज्यातील पाच महापालिका क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. ट्रॅफिक सिग्नल, बस आणि रेल्वे स्थानके, टोल नाके, वाहनतळ, पेट्रोल पंप, बांधकाम सुरू असलेली ठिकाणे, बाजारपेठा आदी ठिकाणी हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते; तर धूर आणि धुळीचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबई शहरात सुमारे 50 ठिकाणी आणि पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिका क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात येणार आहे, अशी माहिती कदम यांनी दिली. 

"स्ट्राटा इनव्हिरो' कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर देशातील बंगळूर, दिल्ली, गोवा आणि ठाणे येथे ही नियंत्रण यंत्रणा बसविली आहे. 2019 पर्यंत देशभरात 100 शहरांत ही यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमोल चापेकर यांनी सांगितले. 

Web Title: Pollution Control Systems in Major Cities