पॉलिटेक्‍निक प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

Admission
Admission

मुंबई - पॉलिटेक्‍निक (अभियांत्रिकी पदविका) प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेला 26 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी पॉलिटेक्‍निक प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास 18 जून मुदत दिली होती. तोपर्यंत सुमारे 42 हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. यापैकी सात हजार 900 विद्यार्थ्यांनी अर्ज निश्‍चित केले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून पॉलिटेक्‍निककडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. पुन्हा विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू केली. परंतु, दहावीच्या निकालानंतर गुणपत्रिका मिळण्यास विद्यार्थ्यांना विलंब झाला आहे.

तसेच, आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रे मिळण्यास उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्‍निकचे अर्ज भरले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी संचालनालयाने ही मुदतवाढ दिली आहे.

प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक
- ऑनलाइन अर्ज निश्‍चित करणे - 26 जून (सायंकाळी पाचपर्यंत)
- आवश्‍यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करणे ः 26 जून
- कागदपत्रांची पडताळणी - 26 जून (सायंकाळी पाचपर्यंत)
- पहिली सर्वसाधारण यादी जाहीर - 27 जून
- विद्यार्थ्यांना तक्रार करण्याची संधी - 28 ते 29 जून (सायंकाळी पाचपर्यंत)
- अंतिम गुणवत्ता यादी - एक जुलै

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com