इथेनॉलबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुणे - साखर उद्योग आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात दिल्ली येथे झालेल्या बैठकीत इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पासाठीच्या कर्जाच्या व्याजात सहा टक्‍के सवलत, वाहतुकीचे दर वाढवून देणे यासह इथेनॉलच्या दराबाबत चर्चा झाली. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याबाबत केंद्र सरकारकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहेत, असे मत साखर उद्योगातील तज्ज्ञांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे.

साखर कारखान्यांकडून इथेनॉलची निर्मिती वाढविणे, तसेच पेट्रोल-डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्याबाबत केंद्र सरकारचे धोरण यशस्वी होण्यासाठी दिल्ली येथे नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीस केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे सहसचिव संदीप पार्युद, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विकास रासकर, नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, पांडुरंग राऊत, रणजित मुळे, महेश देशमुख, हर्षल ठोंबरे, अजिंक्‍य कुदळे, गिराषी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

 जीएसटीचे प्रमाण निश्‍चित करणे, बॅंक गॅरंटी, ऑइल कंपन्यांकडून २१ दिवसांनंतर मिळणारी देयके १५ दिवसांत देणे तसेच निविदा प्रक्रियेत वाढ करणे यासह अन्य मुद्यांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

Web Title: Positive decision regarding ethanol is expected