esakal | काँग्रेसचं सकारात्मक पाऊल; आमदारांचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thorat

काँग्रेसचं सकारात्मक पाऊल; आमदारांचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोविड काळात राज्याला मदत म्हणून काँग्रेसनं एक सकारात्मक पाऊल उचललं आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत यांच्यासह राज्यातील काँग्रेसच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आपलं वेतनं देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व आमदारांच्या या वेतनातून सुमारे २ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. थोरात यांनी ट्विटद्वारे याची घोषणा केली.

ट्वीटनुसार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आपलं एक वर्षाचं वेतन आणि इतर काँग्रेस आमदार आपलं एक महिन्याचं वेतनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. या सर्वांचे मिळून २ कोटी रुपयांचा निधी कोविड काळात मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून ५ लाख रुपये मुख्यमंत्री निधीला देण्यात येणार आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर येथील अमृत उद्योग समुहातील कार्यरत सहकारी संस्थांच्या पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार असल्याची घोषणाही थोरात यांनी केली आहे.