वादग्रस्त आदर्श इमारत ताब्यात घेण्याचे आदेश

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली- वादग्रस्त आदर्श इमारत राज्य सरकारने पाच ऑगस्टपूर्वी ताब्यात घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) दिले आहेत. इमारतीचे पाडकाम करु नका, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने ही वादग्रस्त इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात आदर्श सोसायटीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालायने त्याला स्थगिती देत, ही इमारत लष्कराला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी पाच ऑगस्ट रोजी होणार आहे.

आदर्श इमारत ही लष्कराच्या जागेवर बांधल्याचा आरोप आहे. कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या नातेवाईकांना या इमारतीत घरे देणे आवश्यक होते. मात्र नियमांचे उल्लंघन करुन ही इमारत उभारण्यात आली आहे. आदर्श सोसायटीतील आरोपांवरुन काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Web Title: Possession of the controversial Adarsh building in order to