पुणे, नगर नाशिकसह मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगावसह मध्य महाराष्ट्रात पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

पुणे : पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगावसह मध्य महाराष्ट्रात पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

गेल्या दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. विजांसह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक भागातील पिके अडवी झाली आहेत. 

Rain esakal

हवामान विभागाने आज (गुरुवार) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी प्रतितास राहील, असा अंदाज आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. उद्या सकाळपर्यंतचा हा अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibilities of Rain in Pune Nashik and Other Region