भाजप-मनसे युती होणार? भाजप नेत्याचे स्पष्ट संकेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. भगव्या असलेल्या या झेंड्यामुळे आता मनसे हिंदूत्वाचा अजेंडा राबवणार अशी चर्चा सर्वत्र होत आहे. तसेच मनसे-भाजप युतीबाबतही अनेक चर्चा होत आहेत. पुन्हा एकदा या युतीचे संकेत भाजप नेते गिरीश महाजन यांनी आज (ता. 23) दिले. त्यांनी अशी काही सूचक विधानं केली की लवकरच मनसे-भाजप युती दिसेल की काय अशी शक्यता आहे.  

PHOTO : असा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत नवा झेंडा

महाजन म्हणाले, 'मनसे व भाजपच्या विचारात एकवाक्यता झाल्यास ही युती नक्की होईल. हिंदूत्व हे या दोन्ही पक्षांचे मूळ आहे. अति विभिन्न विचारांचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. तर सारख्या विचारांचे पक्ष एकत्र आल्यास हरकत काय' अशी प्रतिक्रीया त्यांनी दिले. आमचे विचार जुळले तर आम्ही नक्की युतीचा विचार करू असेही महाजान यांनी यावेळी सांगितले. 

Image result for girish mahajan

महाराष्ट्रधर्मासाठी 'अमित ठाकरे' सक्रिय राजकारणात..

आज मनसेचे महाआधिवेशन मुंबई येथे पार पडेल. अधिवेशनाच्या सुरवातीलाच राज यांनी त्यांच्या पक्षाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. हा ध्वज संपूर्ण भगवा असून, मध्यभागी शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. मनसेने ध्वजात राजमुद्रा वापरल्याने अनेक स्तरांतून त्यांना विरोध झाला. मात्र आज याच ध्वजावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज संध्याकाळी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. 

No photo description available.
मनसेचा नवीन ध्वज

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मनसेने ध्वजात भगवा रंग वापरल्याने ते आता हिंदूत्वाचा अजेंडा राबवणार अशी शक्यता वर्तवली जाते. अशातच भाजप-मनसे युतीच्या चर्चाही रंगू लागल्या आहे. त्यात आज भाजपच्या महत्त्वाच्या नेत्याने युतीचे संकेत दिल्याने आता सर्व महाराष्ट्राचे लक्ष या मोठ्या घडामोडीवर लागले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility of alliance of BJP and MNS said Girish Mahajan