दीपक मानकर यांच्या अटकेची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 27) फेटाळला. इस्टेट एजंट जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मानकर यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांची नावे आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा नाकारत असल्याचे न्या. मृदुला भाटकर यांनी स्पष्ट केले. मानकर यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. जितेंद्र जगताप हे अनेक वर्ष दीपक मानकर यांच्याकडे काम करत होते. त्यांनी 2 जून रोजी घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली; मात्र त्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मानकर यांच्यासह पाच जणांचा उल्लेख केला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: possibility of arrest of Deepak Mankar