राष्ट्रवादी काॅग्रेसच्या बैठकीत माेठ्या निर्णयाची शक्यता

save.jpg
save.jpg

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या घडत असलेल्या घडामाेडी अनाकलनीय आहेत. आज सकाळी राष्ट्रवादी काॅग्रेस वाय. बी. चव्हाण सभागृहात आपल्या आमदारांची बैठक घेत आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सध्याच्या स्थितीवर बैठक सुरु आहे.

दरम्यान, या बैठकीत माेठा निर्णय हाेण्याची शक्यता आहे. या बैठकीला निवडून आलेल्या सर्व आमदार तसेच निवडणूकीत पराभव झालेले उमेदवार देखील या बैठकीला उपस्थित आहेत.

या बैठकीत प्रामुख्याने शिवसेनेसाेबत जाण्याचा निर्णय तसेच अनेक घडामाेडींबाबत चर्चा हाेणार आहे. या बैठकीकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या बैठकीत महत्वाचा निर्णय हाेण्याची शक्यता अनेक वरिष्ठ नेत्यांनी वर्तविली आहे.

या बैठकीत प्रफुल्ल पटेल, विधिमंडळ नेते अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com