कोकण, मध्य महाराष्ट्रात शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे: कोकणात सुरू असलेल्या पावसाची मुसळधार थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. शनिवारपर्यंत (ता. 14) कोकणसह, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या (बुधवार) कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये पालघरसह कोकणात पावसाची धुव्वाधार पावसाने दणका दिला. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला. मात्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला असून, जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. कोकणातील पालघर आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. वसई येथे 299 मिलीमीटर, पालघर 290, मांडवी 229, अगशी 224, निर्मल 246, विरार 235, मानिकपूर येथे 259 मिलीमीटर पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

Web Title: The possibility of heavy rains till Konkan, in central Maharashtra, till Saturday