राज्यातील 'या' भागात येत्या 3-4 तासांत वादळी पावसाचा अंदाज; IMDचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

राज्यातील 'या' भागात येत्या 3-4 तासांत वादळी पावसाचा अंदाज; IMDचा इशारा

पुणे : राज्यातील काही भागात पुढील तीन-चार तासात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. काल मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. धुळ्यात काल जोरदार गारपीटही झाली, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं आहे. (Possibility of mod to intense thunderstorms in Maharashtra these regions in next 3 4 hrs)

पुण्याच्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी हा अंदाज वर्तवणारं ट्विट केलं आहे. त्यांनी सांगितलं की, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यावर तीव्र दाट ढगांची गर्दी झाली आहे. तसेच नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि विदर्भातील पश्चिम भाग, मराठवाड्यातही दाट ढग दाटून आले आहेत.

दरम्यान, राज्यातील या सर्व भागात पुढील तीन ते चार तासात गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. मुंबईत सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरु होता. तसेच पुण्यात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पावसाचं वातावण झालं होतं. त्यामुळं पुणे शहरासह जिल्ह्यातील हवेत थंडावा आहे.