मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्‍यता 

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्‍यता 

पुणे - मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविली. विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवसांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

उत्तर आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम आणि बंगालच्या उपसागरावरून होत असलेला बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या खाली घसरले. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात येत्या शनिवारी (ता. 2) ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडेल, अशी शक्‍यता 51 ते 75 टक्के असल्याचे हवामान विभागाने सांगितले. 

राज्यातील तापमानात घट झाल्याने पहाटे गारठा वाढला असून, दिवसा उन्हाचा चटका कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत राज्यात सर्वांत कमी तापमान नगर येथे 10.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. कमाल तापमानाचा सर्वाधिक पारा सोलापूर येथे 36.6 अंश सेल्सिअस नोदला गेला. 

पुण्यात गारठा वाढला 
शहर आणि परिसरात गुरुवारी रात्रीपासून गारठा होता. गेल्या दोन दिवसांपासून हा गारठा जाणवत आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षआ 1.2 अंश सेल्सिअसने कमी होऊन 12 अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर, कमाल तापमानाचा पारा 33.5 अंश सेल्सिअस नोंदला गेला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com