आम्‍हाला हवेत सरसकट मुख्यमंत्री... शरद पवार !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

खामगावात' आम्‍हाला हवेत सरसकट मुख्यमंत्री शरद पवार' अशा आशयाचे पोस्‍टर झळकले आहे. काँग्रेस सेवादलाचे जिल्‍हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी हे आगळे वेगळे पोस्‍टर लावून नागरीकांचे लक्ष वेधून घेतले. 

खामगाव : राज्‍यातील सत्‍ता स्‍थापनेचा तिथा अद्याप सुटलेला नाही. सर्वत्र मुख्यमंत्री कोण होणार याचीच उत्‍सुकता लागलेली असताना खामगावात' आम्‍हाला हवेत सरसकट मुख्यमंत्री शरद पवार' अशा आशयाचे पोस्‍टर झळकले आहे. काँग्रेस सेवादलाचे जिल्‍हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी हे आगळे वेगळे पोस्‍टर लावून नागरीकांचे लक्ष वेधून घेतले. 

नुकत्याच विधानसभा निवडणूका झाल्यात त्यामध्ये महाराष्ट्रात भाजपला पहिली पसंती मतदारांना दिली. तर महायुतीला बहुमत दिले परंतु मुख्यमंत्री पदाला घेवून महायुतीतील महत्वाचे भाजप-शिवसेनामध्ये कुरघोडी पहावयास मिळत आहे. मुख्यमंत्री कुणाचा होणार बहुमत कुठला पक्ष सिध्द करणार हे अजुनही स्पष्ट झालेले नाही.

भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांकडून मी पुन्हा येईल अस म्हणत मुख्यमंत्री पदावर हक्क गाजवताना दिसत आहे. तर दुसरीकडे खामगावात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सरसकट मुख्यमंत्री करा अशा प्रकारच्या फलक सार्वजनिक ठिकाणी लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.

खामगावमध्ये काँग्रेस काही ना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत असते त्यात काँग्रेसने लावलेल्या फलकाची भर पडली आहे. महाराष्टाचा मुख्यमंत्री कोण होईल हे जरी आज सांगता येत नसलं तरी काँग्रेसकडून शरद पवारांच्या नावाला पसंती देण्यात आली असून खामगावात काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी लावलेले फलक शहरभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत तेजेंद्रसिंह चौहान यांनी काँग्रसकडे खामगाव मतदार संघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्‍यांना उमेदवारी मिळाली नाही. दरम्‍यान शरद पवार यांना मुख्यमंत्री करावे अशा आशयाचे पोस्‍टर चव्‍हाण यांनी लावल्‍याने ते राष्ट्रवादीच्‍या वाटेवर तर नाहीत ना अशी एक चर्चा रंगताना दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: posters display on favour of Sharad Pawar as a CM in Nagpur