प्रदीप शर्मांचा राजीनामा मंजूर; 'या' मतदारसंघातून लढण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वसई परिसरातून शिवसेनेतर्फे विधानसभेला उमेदवारीसाठी प्रदीप शर्मा इच्छुक असल्याचेही बोलले जात आहे.

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वसई परिसरातून शिवसेनेतर्फे विधानसभेला उमेदवारीसाठी प्रदीप शर्मा इच्छुक असल्याचेही बोलले जात आहे.

एनकाऊंटर्स ते राजकारण....!

प्रदीप शर्मा हे आधीच शिवसेनेत प्रवेश करणार होते परंतु, राजीनामा दिला नसल्याने त्यांचा प्रवेश लांबला होता. त्यांनी आपला राजीनामा पोलिस महासंचालक मुंबई यांच्याकडे दिला होता, तो मंजूर केल्याने आता त्यांच्या शिवसेना प्रवेशातील अडचणी दूर झाल्या आहेत.

इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची राजकारणात एन्ट्री​

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा

दरम्यान, वसई, विरार नालासोपाऱ्यावर 1990 च्या दशकापासून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी शिवसेना इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपारा विधानसभेत उतरवण्यासाठी विचार करत असल्याचे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pradeep Sharma resigns; Prepare to fight in this constituency