Vidhan Sabha 2019 : बच्चू कडूंचा पक्ष 50 जागा लढवणार; पहिली यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

- प्रहर जनशक्ती पक्ष राज्यात 50 जागा लढवणार
- 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
- दुसऱ्या यादीत माजी आमदारांची नाव असण्याची शक्यता

मुंबई : आमदार बच्चु कडू यांचा प्रहर जनशक्ती पक्ष राज्यात सुमारे 50 जागा लढवणार आहे. त्यापैकी आमदार बच्चू कडू यांनी स्वतःच्या उमेदवारीसह 25 उमेदवारांची पहिली यादी गुरूवारी (ता.3) जाहीर करण्यात आली. दुसरी यादी मध्यरात्री जाहीर करण्यात येणार असून त्यामध्ये राज्यातील काही माजी आमदारांचा समावेश असल्याचे जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष महेंद्र जवंजाळ यांनी सांगितले.

प्रहर जनशक्ती पक्षाची पहिली यादी-

No photo description available.

No photo description available.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदार संघात यापुर्वी सलग तिनवेळा विजय मिळवणाऱ्या आमदार बच्चु कडू त्यांच्या प्रहर जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यात 50 उमेदवार उभे करणार आहे. त्यापैकी 25 उमेदवारांची यादी त्यांनी गुरुवारी जाहीर केली आहे. त्यानंतर दुसरी यादी सुद्धा गुरूवारी मध्यरात्री जाहीर करण्याची शक्यता असून, त्यामध्ये काही माजी आमदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

आमदार बच्चु कडू यांनी लोकसभा निवडणूकीत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटूंबातील महिला तथा अखील भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांना उमेदवारी देऊन राज्याचे लक्ष वेधले होते. दरम्यान, ही निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीत कडू 50 उमेदवार उभे करणार असल्याने पुन्हा विधानसभा निवडणूकीत रंगत येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात राज्यात सुमारे 50 उमेदवार उभे करण्याची प्रहर जनशक्ती पक्षाची भुमीका आहे. त्यातील पहिल्या यादी जाहीर केली असून, दुसऱ्या यादीतील नावे महत्वाची राहणार आहे. काही माजी आमदार सुद्धा उमेदवारीसाठी संपर्कात असल्याने त्यांची नावे असणार आहे.- महेंद्र जवंजाळ, कार्याध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prahar Janashakti Party will contest 50 seats First list of 25 candidates announced