ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडू आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर सत्तास्थापनेचा गुंता सुटला नाही, त्यातच अवकाळी पावसाने शेतक-यांचे उभे पीक गेल्याने त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली.

अमरावती : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी (ता.१४) प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी मुंबई येथील राज्यभवनावर धडक देण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आज दुपारी बच्चू कडू व प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी आझाद मैदानातून राजभवनाकडे कूच केली. परंतू विधीमंडळाच्या समोरील रस्त्यावर या सर्वांना पोलिसांनी अडविले व त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. 

फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार; शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर सत्तास्थापनेचा गुंता सुटला नाही, त्यातच अवकाळी पावसाने शेतक-यांचे उभे पीक गेल्याने त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने त्यांनी आज राजभवनावर धडक देण्याची घोषण केली होती. त्या अनुषंगाने विदर्भ तसेच राज्याच्या अन्य भागातून शेतकरी मुंबईत दाखल झाले होते. 

बच्चू कडू ताब्यात; राष्ट्रपती राजवटीत मोर्चाला परवानगी नाही? 

ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी राजभवनाला घेरावदेखील घालण्यात येणार होता. परंतु या आंदोलनापुर्वीच पोलिसांनी आंदोलनकत्र्यांना स्थानबद्ध केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prahar Sanghatna and MLA Bacchu Kadu protest in Mumbai for farmers