Thur, June 1, 2023

Prakash Ambedkar: आयोगाचा निकाल लागल्यानंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
Published on : 18 February 2023, 8:20 am
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं.
या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
त्यावर वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा ठाकरेंचा निर्णय योग्यच आहे.
निवडणूक आयोग, चिन्ह किंवा पक्षाच्या वादत निर्णय देणं हे त्यांच्या अधिकारात येतं का? हा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.