मोदी स्वत: खात नाही; पण... : अॅड. प्रकाश आंबेडकर

मोदी स्वत: खात नाही; पण... : अॅड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: खात नाही तर ते दुसऱ्याला खायला सांगतात. त्यानंतर ते त्यातील अर्धे मला दे असे सांगतात'', अशा शब्दांत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

- अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातील ठळक मुद्दे - 

- आणीबाणू येणार नाही, याची दक्षता आपण घ्यायला हवी.

- शेतकऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र, सनातनवर कारवाई का नाही?

- शेतकऱ्यांबाबत दानवेंनी केलेले वक्तव्य संतापजनक

- रिलायन्सची तिजोरी भरण्यासाठी तेलाचे किमती वाढवल्या जातात.

- पाकिस्तानात आपल्यापेक्षा कमी दराने पेट्रोल दिले जाते. मग भारतात इतक्या महाग का?

- मोदी स्वत: खात नाही तर दुसऱ्याला खायला सांगतात. त्यानंतर ते त्यातील अर्धे मला दे असे सांगतात.

- देशाला डुबवण्याचे काम ते करतात.

- मोदींचा स्वत:ची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न

- दलाली खाण्यासाठी पेट्रोलचे भाव वाढवले जात आहेत.

- या सर्वातून वंचित बहुजन आघाडी तुम्हाला वाचवू शकेल.

- हमी भाव लागू झाला का? असा सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केला

- सरकारने किरकोळ व्यापाऱ्यांचा घास पळवला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com