LokSabha 2019 : वंचित बहूजन आघाडी लढणार एवढ्या जागा; आंबेडकरांची घोषणा

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

अकोली : वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली. काँग्रेससोबतच्या संभाव्य आघाडीची शक्यता मावळली असून राज्यातील सर्वच म्हणजे 48 मतदारसंघातून उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवीणार असल्याचे जाहिर केले. या आधी वंचित बहुजन आघाडीने 22 उमेदवार जाहिर केले आहेत. उर्वरीत 26 जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावाची यादी गुरुवारी (ता. 15) या दिवशी मुंबई मध्ये जाहिर करण्यात येणार असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.

वंचित बहूजन आघाडीचे नेते अण्णाराव पाटील, लक्ष्मण माने यांच्यासह अनेक जन काँग्रेसशी आघाडीसंदर्भात चर्चा करत होते. वंचित आघाडीने 22 जागी उमेदवार जाहीर केलेत. ते मागे घेणे आम्हाला शक्य नाही. त्यावर काही तरी मार्ग काढावा अशी आमची इच्छा होती. परंतु, काँग्रेसकडून याविषयी काहीही प्रतिक्रिया न आल्याने यातून चर्चा पुढे सरकेल असे वाटले नसल्याचेही आंबेडकर म्हणाले.

मागील अनेक दिवसांपासून अॅड. प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत आघाडी करतील का नाही याविषयी चर्चा सरु होती. तिला आता पुर्ण विराम मिळाले आहे. आंबेडकरांनी काँग्रेस पक्षाला सुरुवातीच्या प्रस्तावत 12 जागांची मागणी केली होती. परंतु, काँग्रेसने नेहमीप्रमाणे झुलवत ठेवले. आमची प्रमुख मागणी ही जागा वाटपाची नव्हतीच, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) संविधानाच्या कक्षेत आणण्याचा आराखडा आम्हाला द्यावा हीच आमची प्रमुख मागणी होती. त्यावर आजही आम्ही ठाम आहोत. परंतु, काँग्रेसने त्यावर आजतागायत काही निर्णय घेतला नाही. तो त्यांनी मान्यही केला नाही. अशा वेळी काँग्रेसनं दिलेले सर्व प्रस्ताव आम्हाला अमान्य आहेत. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

लोकशाहीचं सामाजिकीकरण झालं पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून समाजातल्या वेगवेगळ्या घटकाला उमेदवारी देणं हे राजकीय पक्षांचं कर्तव्य आहे. उर्वरित उमेदवारांचा निर्णय करून 15 तारखेला 48 उमेदवारांची यादी जाहीर करू, लोकसभा निवडणुक आम्ही स्वबळावर लढणार आहोत. 
- अॅड. प्रकाश आंबेडकर, प्रमुख वंचित बहूजन आघाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com