Prakash Ambedkar : NCPच्या उमेदवारामुळे कलाटेंचा पराभव, मग...; आंबेडकरांचा खोचक टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Ambedkar and Sharad Pawar

Prakash Ambedkar : NCPच्या उमेदवारामुळे कलाटेंचा पराभव, मग...; आंबेडकरांचा खोचक टोला

पुणे - नुकतीच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता. राहुल कलाटे यांचा पराभव झाला. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली.

एनसीपीचा उमेदवार नसता तर राहुल कलाटे निवडून आले असते, असं का नाही म्हणत, असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला. कसब्यातील पराभव सरकारच्या विरोधातील निर्णय आहे. तसेच सरकारच्या नाकरत्या कामाचं हे जनमत असल्याचं ते म्हणाले.

आंबेडकर पुढं म्हणाले की काँग्रेस म्हणालं कसबा आम्ही लढवतो, राष्ट्रवादी म्हणालं की आम्ही चिंचवड लढवतो आणि शिवसेना काहीच बोलली नाही. शिवसेना आणि वंचित यांची युती आहे, बाकीच्यांबद्दल काही बोलणार नाही. भाजपची कसब्यात मतं कमी झालेली दिसत नाहीत. धंगेकर यांनी चांगली बांधणी केली म्हणून त्यांना अधिक मत मिळाली. मला असं वाटतं की हा विजय रवींद्र धंगेकर यांचा आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनात औरंगजेबाचे कथित फोटो झळकवले. यावर आंबेडकर म्हणाले की, औरंगजेब या मातीतले नाहीत का? त्यांचा जन्म मोगल सल्तनात मध्येच झाला ना, फोटो लावले म्हणून मला काही नवीन वाटत नाही. ज्यांना हिंदू-मुस्लिममध्ये विभाजन करायचं ते असं बोलत असावेत. जर देशभर एकास एक अशी लढत झाली आणि भाजपने दंगा घडवला तर पुन्हा ध्रुवीकरण होईल. त्यामुळे त्या-त्या वेळेला निर्णय घ्यावे लागतात, असंही आंबेडकर यांनी नमूद केलं.