Lok Sabha Election : दोन हजारांच्या नोटांचा लोकसभा निवडणूकीशी संबंध; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ | Prakash Ambedkar on lok sabha election 2024 | Prakash Ambedkar on withdrawn of 2000 rs notes | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Ambedkar

Lok Sabha Election : दोन हजारांच्या नोटांचा लोकसभा निवडणूकीशी संबंध; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

राज्य तसेच देशात निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण थापताना दिसत आहे. लोकसभा निवडणूका यासोबतच राज्यातील विधानसभा निवडणूकांसाठी देखील राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभां निवडणूकांबद्दल केलेल्या दाव्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा लोकसभा निवडणूकांशी संबंध असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "याला चोकिंग राजकरण म्हणतात. हे चोकिंग राजकारण भाजपने सुरु केलं आहे. विरोधकांना निधीच मिळू नये आणि त्यासोबतच विरोधकांकडे निधी येऊ नये यासाठी टाकलेला हा खेळ आहे असं मी मानतो. इथल्या राजकीय पक्षांनी गाफील राहू नये, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणूका लागतीलच" टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं आहे.

उद्धव ठाकरेंसोबतच महासभेत उपस्थित राहाणार आहात का? यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, ते उद्धव ठाकरेंनी ठरवायचं.

आरबीआयने दोन हजारांच्या नोटा वापरातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या चार महिन्यांमध्ये नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलून मिळणार आहेत. दरम्या दोन हजारांच्या नोटा बंद होणार नसल्या तरी त्यांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे गोंधळून जाण्याची गरज नाही, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. दोन हाजारांच्या नोटा येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असं आरबीआयने जाहीर केलं आहे.