Prakash Ambedkar : 'मविआ'चा प्रयोग निवडणुकीनंतरचा होता; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

prakash ambedkar
prakash ambedkarsakal media

सोलापूरः शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीनंतर महाविकास आघाडीतील इतर पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गप्प गप्प आहेत. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केलं होतं. आता आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगाबद्दल बोचणारं विधान केलं आहे.

राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीनंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधत 'शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल', असा खळबळजनक गौप्यस्फोट केला होता.

प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानानंतर संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येत 'मविआ'चा भाग व्हायचं असेल तर प्रमुख स्तंभांवर बोलू नये, असं म्हटलं आहे. 'शरद पवार हे देशातल्या भाजपविरोधातल्या आघाडीच्या प्रयत्नातले प्रमुख स्तंभ आहेत. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची युती झाली आहे. ते महाविकास आघाडीचे घटक होतील. त्यामुळे त्यांनी प्रमुख स्तंभांवर बोलू नये' असा सल्ला संजय राऊतांनी दिला होता.

त्यामुळे आज सोलापुरातून बोलतांना प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांच्या मुद्द्यावर बोलणं टाळलं आहे. मात्र महाविकास आघाडीबद्दल ते बोलले आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीचा प्रयोग हा पोस्ट इलेक्शन आहे आणि शिवसेना-वंचितचा प्रयोग हा प्रि-इलेक्शन आहे. कार्यकर्त्यांच्या जल्लोषावरुन ही युती यशस्वी होणार हे दिसून येतंय.

शिवसेना-वंचित युतीचा गाजावाजा होऊ नये म्हणून भाजपने राज्यपालांच्या राजीनाम्याचा मुद्दा पुढे केला. वास्तविक पंतप्रधानांकडे राजीनामा देणं, यात काहीही तथ्य नव्हतं. आमची युती ही २०२४ची विधानसभा आणि तोपर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी असल्याचं आंबेडकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com