

पुणेः विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना गुरुवारी पहाटे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंबेडकर यांच्या छातीत छोटी गाठ असून, उद्या (शुक्रवारी) त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार आहे, असे पक्षातर्फे अधिकृत पत्रक काढून माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, वंचितच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचे स्थान सोडून गर्दी करू नये असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.