प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मार्च 2019

अकोला : वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍड. प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ते कॉंग्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्‍यता मावळली आहे. 

अकोला : वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍड. प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ते कॉंग्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्‍यता मावळली आहे. 

याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी (ता. 12) मुंबई येथे करण्यात येईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी अकोला येथे पत्रकार परिषदेत सांगितले. आंबेडकर हे कोणत्या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार, याबाबत चर्चा सुरू होती. वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी मी सोलापुरातून निवडणूक लढावी, अशी इच्छा व्यक्त केली असल्याचे आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानुसार आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्यांनी याला अधिकृत दुजोरा दिला नाही. आंबेडकर यांनी अकोल्याचा पर्याय खुला ठेवला आहे. एकापेक्षा अधिक जागेवरून निवडणूक लढविता येते, असे सांगून त्यांनी सोलापूरसोबतच अकोल्याचा पर्यायही खुला ठेवला आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर हुताम्यांच्या कुटुंबीयांची कुणालाही काळजी करावीशी वाटली नाही. उलट या हल्ल्याचे राजकारण केले जात आहे. कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी कॉंग्रेसच्या काळात 12 एअर स्ट्राइक झाल्याचा दावा केला. त्यावर भाजप नेते राजनाथसिंह यांनी तीन एअर स्ट्राइक केल्याचा दावा केला. याबाबत या दोन्ही नेत्यांनी पुरावे द्यावे. 
ऍड. प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar will contest from Solapur