Vidhan Sabha 2019 : एमआयएमला कोणत्या जागा? आंबेडकर देणार ओवैसींना यादी

owesi_Ambedkar
owesi_Ambedkar

पुणे ः वंचित बहुजन आघाडीकडे एमआयएमने राज्यातील 76 जागांची मागणी केली आहे. त्यांना कोणत्या जागा देता येतील, याची यादी आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज सायंकाळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे देणार आहेत. त्यानंतरच वंचित बहुजन आघाडी व एमआयएम ही निवडणूक एकत्रित लढणार किंवा स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये लॉटरी

लोकसभा निवडणुकीत आघाडी व एमआयएम यांनी एकत्रित दमदार प्रदर्शन केले. यावेळी भाजप-शिवसेना युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी समोरासमोर उभ्या ठाकणार असल्यामुळे तिसऱ्या आघाडीला महत्त्व येणार आहे. वंचित बहुजन आघाडी त्यादृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणार असून, त्यांच्यामुळे अनेक मतदारसंघांतील चित्र बदलणार आहे.

एमआयएमला हव्यात पुण्यातील तीन जागा

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यासंदर्भात "ई सकाळ'शी बोलताना म्हणाले, ""एमआयएमकडून जागांची यादी पाठविण्यात आली आहे. कोणत्या जागा एमआयएमला देता येतील, त्याची यादी आघाडीचे नेते आंबेडकर यांच्याकडून आमच्या पक्षाला आज सायंकाळी देण्यात येणार आहे. ती मिळाल्यानंतर आमच्या पक्षाचा निर्णय होईल.''

पेट्रोल डिझेलच्या वाहनांबाबत गडकरींची मोठी घोषणा

एमआयएमने 76 जागा मागितल्या, तर आघाडीने केवळ आठ जागा देण्याची तयारी दर्शविली आहे, यासंदर्भात विचारल्यावर ते म्हणाले, ""दोन्ही पक्षांचे नेते परस्पराच्या संपर्कात आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून मतदारसंघांची यादी आम्हाला देण्यात येणार आहे. दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढण्याबाबत सध्या सकारात्मक चर्चा झाली आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com