प्रकाश महेता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्यावा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी ताडदेव, मुंबई येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पप्रकरणी विकसकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतला. हे प्रकरण कॉंग्रेस पक्षाने उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी ऑगस्ट 2017 मध्ये लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती; पण अद्याप याप्रकऱणी निकाल आला नाही.

मुंबई - गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी ताडदेव, मुंबई येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पप्रकरणी विकसकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतला. हे प्रकरण कॉंग्रेस पक्षाने उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी ऑगस्ट 2017 मध्ये लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती; पण अद्याप याप्रकऱणी निकाल आला नाही. तो तात्काळ द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी लोकायुक्तांना पत्र लिहून केली आहे.

ऑक्‍टोबर 2018 ला या प्रकरणाची लोकायुक्त कार्यालयात शेवटची सुनावणी झाली होती, असे समजते. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता लोकायुक्त कार्यालयात संपर्क केला असता, हे प्रकरण अतिशय गोपनीय असून, या संदर्भातील माहिती केवळ लोकायुक्तांच्याच कक्षात उपलब्ध आहे, असे सांगितले गेले. या संदर्भात चौकशी सुरू होऊन दोन वर्ष होत आली व सुनावणी होऊन सहा महिने झाले; पण अद्याप निर्णय आलेला नाही.

Web Title: Prakash Mehta Inquiry Decision Sachin Sawant