आम्ही राजकारणाची पोळी केली 

प्रकाश पाटील 
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नरेंद्र मोदी सरकारने पाचशे आणि हजाराची नोट रद्द केल्यानंतर देशभर गरमागरम चर्चा सुरू आहे.

नोटांवर महात्मा गांधीचींऐवजी दुसऱ्या एखाद्या महान नेत्याचे चित्र येणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, ही चर्चा होत असताना महान नेत्यांची बदनामी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी. 

नरेंद्र मोदी सरकारने पाचशे आणि हजाराची नोट रद्द केल्यानंतर देशभर गरमागरम चर्चा सुरू आहे.

नोटांवर महात्मा गांधीचींऐवजी दुसऱ्या एखाद्या महान नेत्याचे चित्र येणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, ही चर्चा होत असताना महान नेत्यांची बदनामी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी. 

सत्य, अहिंसा आणि प्रेम 
बापू तुमचे सत्य आज 
कुटेच सापडत नाही. 
जो-तो म्हणत असतो, 
सत्याशिवाय काही अडत नाही. 
बापू तुमची अहिंसा, 
आज पोरकी होऊन गेली. 
हिंसेच्या पुढे बिचारी 
लालभडक रंगात नाहून गेली. 
बापू तुमच्या प्रेमाची 
आज आम्ही होळी केली, 
रखरखत्या निखा-यावर द्वेषाच्या 
आम्ही राजकारणी पोळी केली. 
सत्य, अहिंसा आणि प्रेमाची 
बापू तुमची शिकवण मोठी, 
असत्य, हिंसा आणि द्वेषाने 
ज्याने-त्याने केली खोटी. 

या गांधीबाबांवरील कवितेच्या ओळी वाचताना डोळ्यासमोर उभी राहिली ती एक हजार आणि पाचशेची नोट. मोदी सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी या दोन नोटा तडकाफडकी रद्द केल्या आणि देशात चर्चेला उधाण आले. सरकारच्या या निर्णयानंतर देशभर पैशाची चणचण भासली.

"एटीएम' आणि बॅंकासमोर रांगा लागलेल्या दिसतात. हे आणखी काही दिवस चालणार. पण, नोटा रद्द करण्याच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियावर येणाऱ्या नोटांवर गांधीबाबाऐवजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र येणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. वास्तविक, बाजारात पाचशे आणि दोन हजाराची नोट यायची आहे. या नोटांवर गांधीजींचे चित्र असेल असे बोलले जाते. मात्र, दुसरे कुठले चित्र असेल का ? याविषयी सरकारने अद्याप कोणताही खुलासा केलेला नसतानाही आपले आपले अंदाजच बांधले जात आहे. शेवटी नोटांचेही राजकारण सुरूच झाले. या सर्व गदारोळात थोर पुरुषांना मात्र का बदनाम केले जात आहे. हेच कळत नाही. नोटांवर शिवाजी महाराज नको असे दर्शविणारी एक कविता व्हॉट्‌सअपवर फिरत आहे. का नको तर म्हणे नोट दारूच्या अड्यावर जाते. भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात जाते वैगेरे वैगेरे. शिवराय हे महाराष्ट्राचे दैवत. आमचा स्वाभिमान आणि शान. शिवरायांसाठी मराठी मन केव्हाही पेटून उठते. इतकी जादू "शिवाजी' या तीन शब्दात आहे. तशीच शक्ती "गांधीजी' या तीन आणि "बाबासाहेब' या पाच शब्दातही आहे. या तिघांसह सर्वच थोर पुरुषांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावू नयेत असे वाटते.

एकीकडे शिवाजीमहाराज नोटेवर नको. नोट कुठेही जाते असे म्हणायचे आणि दुसरीकडे गांधीजींची बदनामी होते आहे हे योग्य असे मानायचे का ? खरंतर नोटांना लक्ष्मी मानून आपण ती देवाऱ्यात पुजतो. ती तिजोरीत असते. तशाच नोटा प्रत्येक ठिकाणी दिसतात. नोटा या भारतीय चलनाचा भाग आहे. त्यामुळे गांधींजीेंचे चित्र पूर्वीपासून नोटांवर आहे. उद्या एखाद्या नोटेवर कोणत्याही एखाद्या महान नेत्याचे चित्र प्रसिद्ध झाले तरी काही बिघडत नाही. याचा निर्णय सरकार घेईल. पण, आपण एकाचा उदो उदो करताना दुसऱ्याला हीन का मानायचे. हा प्रश्‍न उरतोच. 

कवी रमेश ठोंबरे यांनी वरील कविता प्रसिद्ध करताना जी प्रस्तावना केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे,"" देशाला महात्मा गांधीजींनी जे काही दिले त्याची जान आजच्या पिढीला नाही. गांधीजी आणि त्यांचे विचार हे आजच्या चेष्टेचा विषय झाले आहेत. प्रत्येकाच्या विचारसरणीनुसार गांधीजींच्या विचारात उणीव असल्याची जाणीव एखाद्याला झाल्यास ते गैर नाही. परंतु जे मत आहे ते पूर्ण विचारांती असावे. दहा विचारापैकी एखादा विचार एखाद्या वेळी जुळत नसेल तर ती उणीव जरूर ठरेल. परंतु ते गांधीजींच्या विचाराचे अपयश म्हणता येणार नाही.'' ठोंबरे यांच्या कवितेचा प्रत्येकाने आपापल्यापरीने बोध घ्यावा.

Web Title: Prakash Patil write about notes