ईडीच्या कारावाईविरोधात न्यायालयात अपील करणार : प्रताप सरनाईक

ईडीच्या कारवाईनंतर शिवसेना-भाजपमधील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Pratap Sarnaik
Pratap SarnaikSakal Digital

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर या प्रकरणी आपण न्यायालयात अपील करणार आहोत, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपाला आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राजकीय नेता म्हणून अशा गोष्टींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत, केंद्र आणि राज्य यांच्या संघर्षातून ही कारवाई होत असल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असून, 30 दिवसांच्या आत ईडीच्या या नोटीसविरोधात न्यायालयात अपील करणार असल्याचेदेखील सरनाईक यांनी सांगितले. (Pratap Saranaik Reaction After ED Action)

Pratap Sarnaik
UPSC निवड प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींना करता येईल अर्ज, SC आदेश

दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर आपण आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. तसेच भारतीय न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही ते म्हणाले. तसेच ईडीच्या या कारवाईविरोधात आपण 30 दिवसांच्या आत न्यायालयात अपील करणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर न्यायालय जो निर्णय देईल, त्या निर्णयाला अधीन राहून मी पुढची कारवाई होईल." पुढे ते म्हणाले की, "हे 2022 आहे आणि 24 नोव्हेंबर 2020 रोजी माझ्यावर ईडीनं कारवाई केली होती.

Pratap Sarnaik
शेतकऱ्यांसाठी खूशखबर! PM Kisan e-KYC करण्यासाठी मुदत वाढवली

सध्या राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींवर कारवाई केली जात असल्याचे सांगत ते म्हणाले की, आपण NSEL चा फुलफॉर्म शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सरनाईक म्हणाले. ईडीने ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपाला आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com