प्रतापगडावर लवकरच ‘रोप वे’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

स्वराज्याच्या इतिहासाचा किल्ले प्रतापगड हा दुर्ग महत्त्वाचा साक्षीदार आहे. इतिहासप्रेमी पर्यटकांची किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. पर्यटकांना प्रतापगडावर जाणे सोईस्कर व्हावे, यासाठी रोप-वे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- जयकुमार रावल, पर्यटनमंत्री

मुंबई - छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर पर्यटकांना पोचण्यासाठी जावळी गाव (ता. महाबळेश्‍वर) ते प्रतापगड असा रोप-वे होणार आहे. २०१६च्या पर्यटन धोरणांतर्गत या रोप-वे प्रकल्पाला विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीनंतर पर्यटकांना ‘प्रतापगडा’वर जाणे सोपे होणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

हा रोप-वे जावळी गाव (ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) येथून सुरू होणार आहे. हा ५.६ किलोमीटर लांबीचा विशाल रोप-वे प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे भविष्यात प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांना चढण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार असून, गडावर जाणे सोयीचे होणार आहे. या रोप-वेमुळे महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवात भर पडणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्याही वाढणार आहे, असे रावल यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pratapgad Ropeway jaykumar rawal