esakal | राजेंच्या भेटीपूर्वी खडसेंच्या प्रवेशावर दरेकरांनी राष्ट्रवादीला खडसावले
sakal

बोलून बातमी शोधा

राजेंच्या भेटीपूर्वी खडसेंच्या प्रवेशावर दरेकरांनी राष्ट्रवादीला खडसावले

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) खासदार उदयनराजे भाेसले यांची जलमंदिर पॅलेस येथे भेट घेतली. तेथे दाेघांमध्ये काही काळ चर्चा झाली आणि त्यानंतर ते नुकसानग्रस्त भागाच्या दाै-यावर रवाना झाले.

राजेंच्या भेटीपूर्वी खडसेंच्या प्रवेशावर दरेकरांनी राष्ट्रवादीला खडसावले

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : ​​​​​​ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तमपद्धतीने राज्याचा कारभार पाच वर्ष सांभाळला. केवळ सांभाळला नव्हे तर चालवला. या कार्यकूशल नेतृत्वाचा काहींना पोटशूळ उठला असेच म्हणावे लागेल. त्यामुळेच एकनाथ खडसेंचा गेम करून देवेंद्रजींवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात घेतले आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवार) येथे केली.

दरेकर आज (गुरुवार) सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौ-यावर आहेत. येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांनी गाठले. तेथे खडसेंनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत राज्य शासनावर टीका केली. त्यानंतर दरेकर हे खासदार उदयनराजे भाेसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथे गेले. तेथे त्यांनी उदयनराजेंची भेट घेतली. दाेन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. तेथून दरेकर हे नुकासनग्रस्त भागांना भेट देण्यास रवाना झाले.

खडसे भाजप परिणाम : नाशिकमध्ये भाजपची तटबंदी तूर्त भक्कम! 

पत्रकारांशी बाेलताना दरेकर म्हणाले, फडणवीस यांना कोंडीत पकडून त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी एकनाथ खडसे यांचा वापर करण्यात आलेला आहे. खडसेंचा गेम करून फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात घेतले आहे. गेलेल्या ठिकाणी राहून त्यांनी समाजोपयोगी कार्य करावे. आम्ही त्यांना नांदा सौख्यभरे असेच म्हणतो.

अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे. या परिस्थितीत राज्य शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे.  अर्णब गोस्वामी प्रकरणात वकील नेमण्यासाठी राज्य शासनाने वकीलाला पंधरा लाख रुपये दिले इतकी तत्परता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी का दाखवली नाही? असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला.

नाथाभाऊंच्या राजीनाम्यानंतर समर्थकांचे फोन ‘नॉटरिचेबल’

महाराष्ट्रात एखाद्या घटनेत सीबीआय चौकशी लागण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे, याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले, देशाचा व सर्व घटक राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालतो.

कुठल्याही प्रकरणात राज्य आणि केंद्र संघर्ष उभा करणं हे लोकशाहीला मारक ठरेल तसेच आपल्या व्यवस्थेला देखील हे परवडणारे नाही. त्यामुळे अशांतता पसरेल कायद्याने जो मार्ग दाखवला आहे तो सगळ्यांना अंगिकारणे आवश्यक आहे.

राज्य शासनाने सुशांत सिंह प्रकरणात वकील नेमण्यासाठी १५ लाखांची तरतूद केली शेतकऱ्यांना करताना दाखवली जात नाही उलट केंद्राकडे बोट दाखवले जाते हे अत्यंत चुकीचे आहे, असे दरेकर यांनी नमूद केले. 

उदयनराजेंच्या सातारा विकासला भाजपचा ठेंगा!

दरम्यान दरेकर यांचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी जलमंदिर पॅलेस येथे स्वागत केले. तेथे त्यांचा शाल व सातारी कंदी पेढे देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर दाेन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. तेथून दरेकर हे नुकासनग्रस्त भागांना भेट देण्यास रवाना झाले.

loading image
go to top